वाझेंची नार्को टेस्ट करा; अन्यथा ठाकरे सरकारचा खरा चेहरा पुढे येईल – राम कदम

Ram Kadam & Uddhav Thackeray

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय तपास यंत्रणेने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांना शनिवारी रात्री अटक केली आहे. त्यानंतर आता भाजप अधिकच आक्रमक झाला आहे. या कटात सहभागी असलेल्या लोकांची नावे समोर येण्यासाठी सचिन वाझे यांची नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपचे नेते राम कदम (Ram Kadam)यांनी केली आहे.

राज्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २८८ आमदारांना विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करायची होती. भाजपने केवळ सचिन वाझे यांना अटक करण्याचीच मागणी केली होती. मात्र, महाविकासआघाडी सरकारने ही मागणी अमान्य केली. सचिन वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की त्यामुळे सरकार आणि नेते अडचणीत सापडू शकतात? यासाठी सचिन वाझे यांनी नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी राम कदम यांन केली.

मी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहले आहे. कर नाही त्याला डर कशाला पाहिजे. त्यामुळे सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करून दूध का दूध पानी का पानी होऊ जाऊ दे. सचिन वाझे यांची नार्को टेस्ट झाली नाही तर ठाकरे सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल, असे राम कदम यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER