तामिळनाडूत द्रमुक आघाडीवर, केरळात डावे पुन्हा सत्तेत?

Maharashtra Today

नवी दिल्ली : काँग्रेस आणि डाव्यांना आलटून पालटून संधी देणाऱ्या केरळमध्ये यंदा इतिहास घडण्याची शक्यता आहे. डाव्यांच्या नेतृत्त्वाखाली एलडीएफ सत्ता कायम राखेल, असे कल हाती आले आहेत. विधानसभेच्या एकूण १४० जागा असलेल्या केरळमध्ये सध्या डाव्यांनी ९० जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसप्रणित यूडीएफनं ४७ जागांवर मुसंडी मारली आहे. दोनच दिवसांपूर्वी आलेल्या एक्झिट पोल्सनी डाव्यांना बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला होता. तो आता खरा ठरताना दिसत आहे.

दुसरीकडे तामिळनाडूत धक्कादायक निकाल हाती येत आहे. तामिळनाडूमध्ये द्रमुक पक्ष १३५ तर अण्णा द्रमुक ९८ जागांवर आघाडीवर आहे. तामिळनाडूच्या २३४ विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडलीय. तामिळनाडूमध्ये गेल्या १० वर्षांपासून अण्णाद्रमुकची सत्ता आहे. यावेळी तामिळनाडूमध्ये सत्तांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तामिळनाडूची निवडणूक पहिल्यांदाचा करुणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय पार पडली आहे. द्रमुकला तब्बल १० वर्षानंतर सत्ता मिळवण्याची संधी आहे. द्रमुककडून एम. के. स्टॅलिन मुख्यमंत्री होऊ शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button