जोकोवीचच्या बेपर्वाईने टेनिसला कोरोनाने घेरले, दोन खेळाडूंसह चार जण पॉझीटिव्ह

Tennis player Novak Djokovic

कोरोना संक्रमणाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगची खबरदारी घेण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करण्याच्या नंबर वन टेनिसपटू नोव्हाक जोकोवीचच्या बेपर्वा वृत्तीने टेनिस विश्वालाही कोरानाने घेरले आहे. जोकोवीचने आयोजीत केलेल्या एड्रिया टूर या प्रदर्शनी टेनिस स्पर्धेत सहभागी टेनिसपटू ग्रिगोर दिमीत्रोव्ह व बोर्ना कोरीक यांच्यासह दिमित्रोव्हचा प्रशिक्षक ख्रिस्तिीयन ग्रो आणि खुद्द जोकोवीचचा फिटनेस ट्रेनर मार्को पानिकी ही कोरोना पॉझीटिव्ह आढळले आहेत. हे चौघेही क्रोएशियातील झादर येथे जोकोवीचने आयोजित केलेल्या एड्रिया टूर या प्रदर्शनी टेनिस स्पर्धेत सहभागी झाले होते.

बल्गेरियाचा दिमित्रोव्ह हा जागतिक क्रमवारीत तिसºया आणि क्रोएशियाचा बोर्ना कोरीक हा क्रमवारीत ३३ व्या स्थानी आहे. स्वत: जोकोवीच हा जगातील नंबर वन टेनिसपटू असून एवढे चार-चार पॉझीटिव्ह आढळून आल्यानंतरही आपल्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत म्हणून तो स्वत: अद्याप चाचणीला सामोरे गेलेला नाही.

जोकोवीचने आयोजित केलेल्या या स्पर्धेत सोशल डिस्टन्सिंगला पूर्णपणे फाटा देण्यात आला. स्पर्धेसाठी एक प्रदर्शनी फूटबॉल सामना खेळला गेला आणि एक बास्केटबॉल गौरवनिधी सामनाही खेळला गेला. त्यानंतर एक पार्टीसुद्धा झाली. यासर्व ठिकाणी मास्क न लावता आणि अंतर न राखत खेळाडू सहभागी झालेले दिसले. बहुतेक जण गळाभेट घेताना, हस्तांदोलन करताना आणि हडल करताना दिसले. स्वत: जोकोवीचने फॅन्ससोबत फोटो काढले आणि पारितोषिक वितरणावेळी मान्यवरांसोबत हस्तांदोलनही केले. गौरवनिधी बास्केटबॉल सामन्यात खेळलेला सर्बियाचा एक बास्केटबॉलपटू नंतर कोरोना पॉझीटिव्ह आढळून आला. या खेळाडूसोबत जोकोवीच त्या सामन्यात खेळला.

जोकोवीचची सुरुवातीपासूनच भूमिका कोरोनासंदर्भात येणाºया बंधंनांच्या विरोधात राहिली आहे. त्याच्या या वर्तनावर डच महिला टेनिसपटू किकी बर्टेन्स हिने दोन दिवसांपूर्वीच टीका केली होती आणि जगाच्या कोणत्या भागात सोशल डिस्टन्सिंग पाळू नका असे सांगितलेय असा सवालही तिने केला होता. त्यानंतर आता आॅस्ट्रेलियन निक किरयोससह बºयाच जणांनी जोकोवीचच्या बेपर्वा वृत्तीवर टीका केली असून टिष्ट्वटरवर तो टीकेचे लक्ष ठरला आहे.

जोकोवीचच्या अशा बेपर्वाईने टेनिसचे अपरिमीत नुकसान होण्याची भीती अनेकांना असून आता टेनिसच्या स्पर्धा, ज्या १४ आॅगस्टपासून पुन्हा सुरु होणार होत्या, त्याचासुद्धा फेरविचार केला जाण्याची शक्यता गृहीत धरण्यात येत आहे.

दिमित्रोव्हने रविवारी आपण कोरोना पॉझीटिव्ह असल्याचे जाहीर केल्यानंतर जोकोवीच आणि आंद्रे रुबलेव्हदरम्यानचा अंतिम सामना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी बोर्ना कोरिकनेसुद्धा आपल्याला लागण झाल्याची बातमी दिली. कोरिकने म्हटलेय की गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची चाचणी करून घ्यायला हवी. आपल्यामुळे कुणाला लागण झाली असेल तर मी माफी मागतो. मला बरे वाटतेय आणि कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. कृपया घरातच रहा आणि सुरक्षीत रहा असे आवाहन त्याने आपल्या टिष्ट्वटमध्ये केले आहे.

निक किरयोस याने म्हटलेय की अशा वातावरणात कोणतही काळजी न घेता स्पर्धा खेळविण्याचा निर्णय बिनडोकपणाचा होता. ही गंमतीने घेण्याची गोष्ट नाही. मित्रांनो, लवकर बरे व्हा, पण तुम्ही नियम पाळणार नसाल तर असे होणारच असे त्याने आपल्या टिट्वटमध्ये म्हटलेय.

जोकोवीचच्या या स्पर्धेत डॉमिनिक थिएम, मारिन सिलीक, अ‍ॅलक्झांडर झ्वेरेव्ह सारखे नामवंत टेनिसपटूसुद्धा सहभागी झाले होते.

स्पर्धेचा आयोजक असलेला नोव्हाकचा भाऊ जॉर्ज म्हणाला की नोव्हाकने दिमित्रोव्ह पॉझीटिव्ह आल्याची बातमी गंभीरतेने घेतली आहे. आम्ही सर्बिया व क्रोएििशया सरकारने घालून दिलेले सर्व बंधने पाळली आहेत.

एड्रिया टूरचे सामन्यांना दररोज सुमारे चार हजार प्रेक्षक हजेरी लावत होते अशी माहिती आहे. झादर येथील सामन्यांआधी गेल्या आठवड्यात बेलग्रेड येथे जोकोवीचच्या टेनिस सेंटरवर या स्पर्धेचे सामने खेळले गेले. त्यानंतर खेळाडू बेलग्रेडमध्ये पार्टीसुद्धा करताना दिसले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER