जोकोवीच विक्रमी सहाव्यांदा वर्षअखेर ‘नंबर वन’

Novak Djokovic

*पीट सॕम्प्रासच्या विक्रमाची बरोबरी
*फेडरर व नदालला मागे टाकले
*सर्वाधिक वयाचा नंबर वन खेळाडू

सर्बियन (Serbia) टेनिसपटू (Tennis) नोव्हाक जोकोवीच (Novak Djokovic) कितीही वादग्रस्त ठरत असला तरी यशाचे नवनवीन शिखरं पार करत आहे. आता त्याने यंदा वर्षअखेर जागतिक क्रमवारीतील पहिले स्थान निश्चित केले आहे आणि यासह त्याने आपला हिरो पीट सॕम्प्रासच्या (Pete Sampras) विक्रमाची बरोबरी केली आहे. सॕम्रासनंतर आता जोकोवीचसुध्दा सहा वर्षे वर्षअखेर नंबर वन आहे.

व्यावसायिक टेनिसमध्ये वर्षअखेरच्या नंबर वन स्थानाला फार महत्त्व असते आणि यात सॕम्प्रास व जोकोवीच हे दोघे सर्वाधिक सहा सहा वेळा नंबर वन राहिले आहेत. याशिवाय 33 वर्षे वयात जोकोवीच हा वर्षअखेरचा सर्वाधिक वयाचा नंंबर वन खेळाडू ठरला आहे. तो 2011, 12, 14, 15, 18 आणि आता 2019 नंतर वर्षअखेर नंबर वन आहे.

जोकोवीच ज्या खेळाडूला आपला हिरो मानतो तो अमेरिकेचा पीट सॕम्प्रास 1993 ते 1998 या सलग सहा वर्षात वर्षअखेरीस नंबर होता.

गेल्या 17 वर्षात केवळ 2016 चा अपवाद वगळता जोकोवीच, नदाल व फेडरर हेच वर्षाअखेरचे नंबर वन राहिले आहेत. 2016 मध्ये अँडी मरे नंबर वन होता. तर या त्रिमुर्तींच्या आधी 2003 मध्ये अँडी राॕडिक नंबर वन होता.

सहाव्यांदा वर्षअखेर नंबर वन राहिलेला जोकोवीच आता 3 फेब्रुवारी 2020 पासून पहिल्या स्थानी आहे. त्याने यंदा एक ग्रँड स्लॕम अजिंक्यपदासह व दोन एटीपी मास्टर्स विजेतेपदासह चार स्पर्धा जिंकल्या आहेत आणि सर्बियाला एटीपी कप स्पर्धेचे विजेतेपदही मिळवुन दिले आहे.

पीट सॕम्प्रासबद्दल जोकोवीचने म्हटलेय की, मी पीटलाच आदर्श मानत, त्याचा खेळ बघत मोठा झालोय. त्यामुळे त्याच्या विक्रमाची बरोबरी करणे ही माझ्यासाठी स्वप्नपूर्ती आहे. मी आणखी चांगला खेळाडू बनण्याचा प्रयत्न करतोय.म्हणून ज्या खेळावर माझे मनापासून प्रेम आहे त्यात आणखी विक्रम करण्याची आणि अधिक यश मिळविण्याची माझी इच्छा आहे.

एटीपीचे चेअरमन अँद्रीया गोदेन्झी यांनी म्हटलेय की, वर्षअखेर नंबर वन राहण्यासाठी सातत्याने चांगली कामगिरी करावी लागते. नोव्हाकने सहाव्यांदा अशी कामगिरी करताना पीटची बरोबरी केलीय ही अतुलनीय कामगिरी आहे.

आता सोमवारी जोकोवीचचा क्रमवारीत नंबर वन म्हणून 294 वा आठवडा असेल. सॕम्प्रास 286 आठवडे नंबर वन होता. 8 मार्च 2021 पर्यंत जोकोवीच नंबर वन राहिला तर तो फेडररचा सर्वाधिक 310 आठवडे नंबर वन राहण्याचा विक्रम मागे टाकेल.

वर्षअखेर सर्वाधिक वेळा नंबर वन

नोव्हाक जोकोवीच (सर्बिया)- 6 वेळा
2020, 18, 15, 14, 12, 11

पीट सॕम्प्रास (अमेरिका)- 6 वेळा
1998, 97, 96, 95, 94, 93

जिमी काॕनर्स (अमेरिका)- 5 वेळा
1978, 77, 76, 75, 74

राॕजर फेडरर (स्वीत्झर्लंड) – 5 वेळा
2009, 07, 06, 05, 2004

राफेल नदाल (स्पेन) – 5 वेळा
2019, 17, 13, 10, 2008

जाॕन मॕकेन्रो (अमेरिका) – 4 वेळा
1984, 83, 82, 81

इव्हान लेंडल (झेक) – 4 वेळा
1989, 87, 86, 85

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER