जोकोवीच म्हणतो, “लस घ्यायची की नाही हे खेळाडूंना ठरवू द्या!”

Novak Djokovic

जगभरातील जवळपास सर्व देश कोरोनाने त्रस्त असताना आणि कोरोनाशी (Corona) मुकाबला करण्यासाठी लस घेण्याचा आग्रह असताना जगातील नंबर वन टेनिसपटू (Tennis) नोव्हाक जोकोवीचने (Novak Djokovic) मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. खेळाडूंना कोरोना प्रतिबंधक लस (Covid Vaccine) घेणे अनिवार्य न करता ऐच्छिक असावे असे मत त्याने व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी जोकोवीच स्वतः, त्याची पत्नी आणि भाऊ कोरोना पॉझिटीव्ह आले होते.

जगभरातील पुरुषांच्या टेनिस स्पर्धांचे नियंत्रण करणारी संस्था, एटीपीने या महिन्याच्या आरंभी जारी केलेल्या धोरणात म्हटले होते की, ज्या खेळाडूंचे लसीकरण झालेले असेल ते पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आले असले तरी त्यांना ‘क्लोज काँटॕक्ट’ मानले जाणार नाही. लस घेतल्याने असे सुरक्षित मानल्या जाणाऱ्या खेळाडूंची यादीसुध्दा एटीपीने प्रसिध्द केली आहे. महिला टेनिसची संघटना, डब्ल्यूटीएनेसुध्दा खेळाडूंना लसीकरण करुन घेण्याचे आवाहन केले आहे.

या पार्श्वभूमीवर जोकोवीचने आशा व्यक्त केली आहे की टेनिसपटूंना लस घेणे बंधनकाराक करण्यात येवू नये. मला लसीचे समर्थन आणि विरोध असा विषय करायचा नाहीये, ते मीडियाचे काम आहे आणि तसा वाद निर्माण करणे दुर्देवी आहे असे या नंबर वन टेनिसपटूने म्हटले आहे.

लसीबाबत खेळाडूंच्या स्वातंत्र्यावर गदा न आणता त्यांना एटीपीने स्पर्धांमध्ये खेळू द्यायला हवे असे मत त्याने मांडले आहे.

जोकोवीच म्हणतो की लशींचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत पण ती अनिवार्य आहे का, याबाबत स्पष्टता नाही. सक्ती करण्याच्या टप्प्यावर जाण्याची वेळ येणार नाही असे मला.वाटते कारण माझ्या मते खेळाडूंच्या निवडीचे स्वातंत्र्य अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे लस घ्यायची की नाही हे त्यांचे त्यांना ठरवू द्या. हा फार नाजूक मुद्दा आहे. मात्र यामुळे मी लशीचा विरोधक आहे की समर्थक आहे याचे कृपया लेबल मला लावू नका. मी त्याचे उत्तर देणार नाही आणि माझ्या मतांचा यासंदर्भात आदर करावा अशी माझी इच्छा आहे असे जोकोने म्हटले आहे.

गेल्यावर्षी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या जोकोवीचने याच्याआधीसुध्दा लशीला विरोध व्यक्त केलेला आहे आणि प्रवासासाठी कुणाला लशीचे बंधन घालणे चुकीचे असल्याचे स्पष्ट मत त्याने व्यक्त केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button