मेलबोर्न पार्कवर ‘जोकोवीच’च किंग

Djokovic

राफेल नदालने ज्याप्रमाणे स्वत:ला क्ले कोर्ट किंग सिध्द केले आहे त्याप्रमाणेच नंबर वन नोव्हाक जोकोवीच (Novak Djokovic) यानेसुद्धा आपण मेलबोर्न पार्कचे किंग असल्याचे सिध्द केले आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये (Australian Open) तो विक्रमी नवव्यांदा अजिंक्य ठरला आहे. अंतिम सामन्यात त्याने रशियाच्या दानिल मेद्वेदेववर (Daniil Medvedev) ७-५, ६-२, ६-२ असा सहज विजय मिळवला. हा सामना एक तास ५३ मिनीटात आटोपला.

जोकोवीचचे हे १८ वे ग्रँड स्लॅन अजिंक्यपद असून प्रत्येकी २० अजिंक्यपदं नावावर असणाऱ्या रॉजर फेडरर व राफेल नदाल यांच्यासोबतचे अंतर त्याने आणखी कमी केले आहे.

मेद्वेदेवने पहिल्या सेटमध्ये चांगला प्रतिकार केला पण नंतर त्याची जोकोवीचपुढे काहीच मात्रा चालली नाही आणि त्याची पहिल्या ग्रॅँड स्लॅम विजेतेपदाची प्रतीक्षा आणखी लांबली. या सामन्याआधी मेद्वेदेवने सलग २० सामने जिंकले होते पण त्याची ही मालिका खंडीत झाली आहे. मेद्वेदेव दुसर्यांदा ग्रँड स्लॅमच्या अंतिम सामन्यात खेळत होता.

या स्पर्धेत जोकोवीच सलग तिसऱ्यांदा अजिंक्य ठरला आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या या ‘लव्ह अफेयर’ बद्दल जोकोवीच म्हणाला की, या कोर्टच्या मी प्रेमात पडलोय, रॉड लेव्हर एरिनाला माझे धन्यवाद. वर्षागणिक माझे या एरिनावरचे प्रेम वाढत आहे आणि हे प्रेम कायम राहील. मेद्वेदेवची आपण सामना केलेला सर्वात पक्का प्रतिस्पर्धी असे वर्णन करताना जोको म्हणाला की तुझ्या हातीसुद्धा ग्रँड स्लॅम विजेतेपदाची ट्रॉफी राहील ही फक्त काही काळ वाट पाहण्याची गोष्ट आहे. तुझी हरकत नसेल तर फक्त काही वर्ष..अशी त्याने मद्वेदेवची फिरकीसुद्धा घेतली. वयाच्या तिशीनंतर ऑस्ट्रेलियन ओपन तीन वेळा जिंकणारा जोकोवीच हा टेनिसच्या खुल्या युगातील पहिलाच खेळाडू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER