जोकोवीचच्या ‘त्या’ चुकीची किंमत 2 लाख 60 हजार डॉलर्स

Novak Djokovic

युएस ओपन टेनिस स्पर्धेत (US open tennis) महिला लाईन जजला (Line Judge) चेंडू मारल्याने अपात्र ठरविण्यात आलेला जगातील नंबर वन टेनिसपटू नोव्हाक जोकोवीच (Novak Djokovic) याला 10 हजार डॉलर्सचा दंडसुध्दा (Fine) करण्यात आला आहे. ही एक चूक त्याला भलतीच महागात पडली आहे. याशिवाय दोन लाख 50 हजार डॉलरच्या बक्षीस रकमेवरही त्याला पाणी सोडावे लागणार आहे. अखिलाडूवृत्तीच्या वर्तनासाठी (Unsportsmanlike behaviour) त्याला ही किंमत चुकवावी लागली आहे.

एकतर यामुळे तो बदनामीकारकरित्या स्पर्धेच्या बाहेर पडला. फेडरर, नदाल, वावरिंका, किरयोसा यांच्या गैरहजेरीत त्याच्या चौथ्या युएस ओपन विजेतेपदाची आणि 18 व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाची संधी हुकली. याशिवाय या स्पर्धेतून मिळणारे सर्व गूण त्याने गमावले. त्यामुळे वर्षअखेर नंबर वनपदी कायम राहण्याचे आणि दुसऱ्या स्थानवरील राफेल नदालपासून अंतर वाढवण्याच्या त्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे आणि तिसरे म्हणजे यंदाच्या यूएस ओपनमधून मिळू शकणारी सर्व प्रकारची बक्षीस रक्कमही त्याला गमवावी लागली आहे.

युएस टेनिस असोसिएशनने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, नोव्हाक जोकोवीचला 10 हजार डॉलरचा दंड करण्यात येत आहे. शिवाय त्याची दोन लाख 50 हजार डॉलरची बक्षीस रक्कमही त्याला मिळणार नाही. या प्रकरणात त्याला 20 हजार डॉलरपर्यंत दंड होऊ शकला असता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER