जोकोवीच म्हणतो, माझ्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे वर्षअखेर मिळतील?

Djokovic has special year end plans

नोव्हाक जोकोवीचने (Novak Djokovic) नवव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून मेलबोर्न पार्कवर तोच ‘किंग’ असल्याचे सिध्द केले आहे पण जगातील या नंबर वन खेळाडूचे कोणतेही यश विवादाशिवाय राहिलेले नाही. यावेळच्या विजेतेपदाच्या मार्गातही त्याची दुखापत खरी की ढोंग अशी शंका उपस्थित केली गेली.

चौथ्या फेरीच्या सामन्याआधी जोकोवीचने आपल्याला दुखापत झाल्याचे आणि त्यामुळे आपण पुढचे सामने खेळू शकू की नाही याची शंका बोलून दाखवली होती मात्र त्यानंतर चौथ्या फेरीचा सामना तो अगदी सहजपणे खेळला आणि त्यात मिलोस राओनीकला (Milos Raonic) 7-6, 4-6, 6-1, 6-4 त्याने अशी मात दिली त्यामुळे जोकोवीचचा दुखापतीचा दावा कितपत खरा होता याबद्दलच शंका व्यक्त केली गेली होती.

याबद्दल आता विजेतेपद पटकावल्यावर त्याने आपल्या टीकाकारांना उत्तर दिले आहे. त्याने म्हटलेय की माझ्या दुखापतीबद्दल भरपूर चर्चा झाली, मला खरोखरच दुखापत झाली होती का, असे लोक विचारतात, मी एवढ्या लवकर तंदुरुस्त कसा झालो याबद्दलही त्यांना शंका आहे, एवढ्या झटपट कोणी रिकव्हर होऊ शकत नाही असेही त्यांना वाटते. मला ह्या सर्व गोष्टी माहित आहे, प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या दृष्टीने विचार करण्याचा आणि मते मांडण्याचा हक्क आहे. टीका करण्याचा हक्क आहे पण कधीकधी हे सर्व अवाजवी होतेय असे वाटते. पण हे काही पहिल्यांदाच घडलेले नाही आणि पुढे घडणार नाही असेही नाही.

आपल्याबद्दलच्या या शंकांचे उत्तर वर्षअखेरीस सर्वांना मिळणार आहे. माझी एक डॉक्युमेंटरी येणार आहे ज्यात गेल्या आठ-दहा दिवसांत मी काय केलेय ते सर्व बघायला मिळणार आहे, मी करत असलेल्या बऱ्याच गोष्टी त्यात नोंदल्या गेल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही त्यांचे चित्रीकरण करत आहोत. ही डाॕक्युमेंटरी वर्षअखेर यावी असे आमचे प्रयत्न आहेत. त्यात दूखापतीतुन मी कसा सावरतो याशिवाय पडद्यामागच्या भरपूर गोष्टी बघायला मिळणार आहेत असे त्याने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER