जोकोवीच व नदाल मोडतील मार्गारेट कोर्ट यांचा विक्रम- इव्हानसेविकला विश्वास

Djokovic and Nadal

यंदाची आॕस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर नंबर वन नोव्हाक जोकोवीच आणि त्याचे प्रशिक्षक गोरान इव्हानसेविक यांनी आता 18 व्या ग्रँड स्लॕम अजिंक्यपदानंतर पुढच्या योजना काय व कशा असतील त्याबद्दल भाष्य केले आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना राॕजर फेडरर व राफेल नदाल यांच्या 20 ग्रँड स्लॕम विजेतेपदांचा विक्रम मागे टाकायचा आहे. ही इच्छा त्याने लपवूनसुध्दा ठेवलेली नाही.

याबाबत इव्हानसेविक म्हणतो की, नदाल आणखी एक किंवा दोन वेळा फ्रेंच ओपन जिंकेल. त्यामुळे त्याची स्लॕम विजेतेपदे 22 असतील. त्यामुळे जोकोवीचला नदालच्या पुढे जायचे असेल तर त्याला सेरेना विल्यम्सच्या 23 स्लॕम अजिंक्यपदांच्या विक्रमाची बरोबरी करावी लागेल. मार्गारेट कोर्ट यांच्या नावावर सर्वाधिक 24 ग्रँड स्लॕम विजेतेपदे आहेत. इव्हानसेविकला वाटते की जोकोवीच व नदाल ही संख्या मागे टाकतील.

तो म्हणतो की, हे दोघे कुठवर जातील ते सांगता येत नाही कारण ते अफलातुन आहेत. दरवेळी ते आम्हाला चकित करत असतात. राफा दोन नाही तर एक ग्रँड स्लॕम स्पर्धा तर निश्चितच जिंकेल, दोनही होऊ शकतात सांगता येत नाही. ते पुन्हा पुन्हा चांगल्या खेळाचे प्रदर्शन करताहेत. प्रत्येकवेळी जेंव्हा वाटते हे आता संपलेय आणि तरुण पिढी पुढे येतेय, पण प्रत्येकवेळी ही मंडळी आपण इतरांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे दाखवून देतात. ते कुठवर पोहोचतील माहित नाही. कोर्ट व सेरेना यांना कदाचित मागे टाकतील. पण ते मोठ्या स्पर्धांमध्ये जे काही कामगिरी करताय ती अफलातून आहे. राॕजर फेडररच्या पुनरागमनाचीही वाट बघतोय. तो आल्यावर यंदाच्या फ्रेंच ओपन व विम्बल्डनमध्ये काय होईल ते बघणे मनोरंजक ठरणार असल्याचे इव्हानसेविकने म्हटले आहे.

दरम्यान, 33 वर्षीय जोकोवीच हा फेडररचा आणखी एक विक्रम मोडणार हे निश्चित आहे. आता सर्वाधिक आठवडे नंबर वन राहाणारा टेनिसपटू अशी त्याची नोंद होणार आहे. आता हा विक्रम साध्य झाल्याने आपल्याला ग्रँड स्लॕम स्पर्धांवर लक्ष केंद्रीत करता येणार आहे असे जोकोवीचने म्हटले आहे. नंबर वनचा जेंव्हा विषय येतो तेंव्हा वर्षभरात तुम्हाला भरपूर स्पर्धा खेळायच्या असतातआणि त्यात सातत्याने चांगली कामगिरी करायची असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER