महाराष्ट्रात नरकासुराने मंदिरे बंद ठेवल्याने दिवाळी साजरी करू नये- बंडातात्या कराडकर

मुंबई : लॉकडाऊननंतर मिशन बिगेन (Mission Begin Again) अंतर्गत राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात अनेक गोष्टी या पूर्णपणे सुरू करण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी ५० टक्के क्षमतेवर सुरू आहेत. मात्र अजूनही राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत ठाकरे सरकारने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. यावरून वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर (Banda Tatya Karadkar) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Govt) निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राच्या नरकासुराने राज्यातील मंदिरे बंद करून ठेवल्याने यंदा दिवाळी साजरी करू नये. करायचेच झाल्यास त्यांच्या नावे ‘शिमगा’ करा तसेच आंघोळ करायची आणि गोड खायचे असेल तर या अधर्मी, नास्तिक असुरांचे चौदावे घालत खा, असे आवाहन बंडातात्या कराडकर यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER