दिवाळी खरेदीची बाजारात लगबग

Diwali Shopping -Market -Kolhapur

कोल्हापूर : दिवाळी खरेदीनिमित्त (Diwali shopping) ग्राहकांनी बाजारपेठेत गुरूवारी गर्दी केली होती. रेडीमेड कपडे, दागिने, दुचाकी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, लॅपटॉप, एलईडी, घरखरेदी, गृहपयोगी वस्तू, फुले, आकाश कंदील, रांगोळी, मिठाई, फराळ आदी खरेदीची बाजारपेठेत (Market) लगबग दिसत होती.

कोरोनामुळे गेल्या सात महिन्यात बाजारपेठेत शांतता होती. नुकताच झालेल्या दसरा निमित्ताने खरेदीला उधान आले. यानंतर मनात योजलेली खरेदी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर करण्याचा अनेकांनी मानस केला. दिवाळी सणानिमित्त ग्राहकांना मनसोक्त खरेदी करता यावी, यासाठी शहरातील सर्वच प्रमुख बाजारपेठा पंधरा दिवसांपासून सजल्या आहेत. दिवाळीनिमित्त खास सवलत, मोफत भेटवस्तू तसेच फायनान्स ऑफर्स देवू केल्या आहेत. ग्राहक या ऑफर्सचा पुरेपूर लाभ घेत आहेत.

दिवाळीनंतर येणाऱ्या लग्नसराईसाठी देखील आताचा खरेदी होत आहे. त्यामुळे कपडा मार्केटही चांगलेच तेजीत आले आहे. नवनव्या फॅशनच्या कपड्यांनी दुकाने सजली आहेत. तयार कपड्यांवर विशेष ऑफर्स दिल्या आहेत. एका खरेदीवर एक फ्रि, कॅश डिस्काउंट, तसेच भेटवस्तूची ऑफर्स ग्राहकांना देवू केली आहे. कपडे खरेदीसाठी मॉल्स आणि मोठ्या दुकानांमध्ये सहकुटुंब ग्राहक येत आहेत. गांधीनगर येथेही कपडे खरेदीला पसंदी दिली जात आहे. कापड दुकानांमध्ये साडी खरेदीसाठी महिलावर्गाची विशेष गर्दी दिसत आहे.

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर टीव्ही, फ्रीज, वातानुकूलित यंत्र, ओव्हन, सीडी, एलसीडी, संगणक यासारख्या वस्तू खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. वाहनांची आगाऊ नोंदणी मोठ्या संख्येने होत आहे. कागदपत्रांची पूर्तता करून ही वाहने तसेच वस्तू पाडव्याच्या मुहूर्तावर घरी नेण्यचे अनेकांनी नियोजन केले आहे. मोबाइलसह इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी झिरो डाउन पेमेंट, ईएमआय, शून्य टक्के व्याजासह कर्ज आदी सुविधाही देण्यात आल्या आहेत. खास डिस्काउंटसह नवे नवे फिचर असलेले फोन दिवाळीनिमित्त लाँच केले आहेत. लॅपटॉप, वॉशिंग मशिन, अँड्राइड आणि स्मार्ट टीव्ही, ओव्हन, मिक्सर, आदी गृहपयोगी वस्तू खरेदीला पसंदी दिली जात आहे.

मिठाई, ड्रायफ्रुटस्‌ तसेच तयार फराळ खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. बाजारपेठ सणासुदीसाठी सज्ज असतानाच शहरातील विविध मॉलमध्येदेखील आकर्षक सवलतींचा ग्राहक लाभ घेत आहेत. रस्त्यांवर लावलेल्या स्टॉलवर आकाशकंदील, रांगोळी, फुले, पणत्या, फटाके आदी दिवाळीनिमित्त लागणाऱ्या वस्तूंची खरेदीसाठी रात्री उशीरापर्यंत ग्राहकांची वर्दळ होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER