ही दिवाळी इंडो वेस्टर्न स्टाईलची…

Fashion

भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे ‘दिवाळी’. घरोघरी उल्हासाचा, आनंदाचा वातावरण बघायला मिळतो. तसेच दागिने खरेदी करण्यासाठी हा सण एक निम्मितच म्हणावे. शिवाय फॅशन ची तर जणू काही काॅम्पीटीशनच असते, मुख्य म्हणजे मुलींंमध्ये. पण हल्लीच्या मुलींचा कल स्मार्ट, आरामदायी, वेगवेगळ्या प्रसंगी वापरता येईल अशा कपड्यांवर असतो. त्यांना भारी भक्कम असलेले कपडे नको असतात. काहींना तर वेगवेगळे प्रयोग करायलाही आवडतात. जर या दिवाळीत तुम्हाला ही काही नवीन करायच असेल तर तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय खास ही दिवाळीची नवीन फॅशन..विशेष म्हणजे तुम्हाला या साठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत आणि तुम्ही सर्वात हटके ही दिसाल.

  • क्रॉप टाॅप विद स्कर्ट :-  सध्याचा क्रॉप टाॅप हे फॅशन बनला आहे. तुम्ही या खाली लाँग स्कर्ट ला पेअर करू शकता. सोबत सिल्वर ज्वेलरी ला परिधान करून या लुक ला कम्प्लीट करा.

diwali- crop top wid skirt

  • काॅटन टाॅप विद साडी :- प्रत्येक मुलीकडे काॅटन टी-शर्ट असतोच. या वर काही नवीन करायचं असेल तर आपल्या आईची साडी आणि काॅटन टी-शर्टला मिक्स मॅच करा. तुम्ही तुम्हाला आवडेल ती साडी या वर वापरू शकता. या वर हेवी इअरिंग ला पेअर करा. हा तुम्हाला हटके लुक देईल.

diwali- cotton top wid saree 1

  • प्लाजो विद लाँग कुर्ती :- डार्क प्लाजो सोबत लाईट कलरची लाँग कुर्ती सर्वात कम्फर्टेबल आॅपशन आहे. तुम्ही यावर बनारसी ओढणी ला पेअर करा. हा लुक तुम्हाला उठून दिसेल. शिवाय सर्वांना आवडेल ही.

diwal- palazzo with long kurti

  • लाँग श्रग विद टँक टाॅप :- तुमच्याकडे जर लाँग श्रग असेल तर या दिवाळीत तुम्हाला नक्की वापरता येईल. इनर मध्ये टँक टाॅप व लाँग श्रग आणि त्याखाली प्लाजोचे काॅम्बिनेशन शोभून दिसेल.

टीप :- वरील प्रत्येक आउटफिट ला सिल्वर ज्वेलरी सोबत पेअर करा. या सर्व लुक वर सिल्वर ज्वेलरी आणि तुमचा लुक आणखी उठून दिसेल.