अयोध्येत आज दिवाळी; राममंदिर भूमिपूजन 12.44 च्या मुहूर्तावर

राममंदिर भूमिपूजन

अयोध्या : अयोध्या(Ayodhya) नगरीतील राम मंदिर भूमिपूजनाचा(Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan) ऐतिहासिक सोहळा अवघ्या काही तासांत होणार आहे. अयोध्येत आज दिवाळी साजरी होणार आहे. ख-या अर्थाने आज रामाचा वनवास संपला असल्याची भावना देशवासीया्च्या मनात आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांच्या हस्ते दुपारी 12 वाजून 44 मिनिटांच्या मुहूर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 9.35 वाजता दिल्लीहून अयोध्येला रवाना होतील. साधारण 11.30 वाजता अयोध्या साकेत कॉलेज हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर हनुमानगढी येथे पोहोचून ते दर्शन आणि पूजा करतील. त्यानंतर रामलल्ला विराजमान यांचे दर्शन घेतील.

कार्यक्रमाला जेमतेम १७५ संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण अयोध्या सील करण्यात आली आहे. मोदींच्या हस्ते भूमिपूजन होऊपर्यंत अयोध्येत एसपीजी (SPG) आणि एनएसजी (NSG) जवानांचा कडेकोट पहारा असणार आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांचीही कसून तपासणी होणार आहे. राम मंदीर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे पोलीस देखील सतर्क राहत आहे. भूमिपूजनाच्या या पार्श्वभूमीवर कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस खबरदारी घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER