एसटी कामगारांची दिवाळी गोड होणार?; शरद पवारांनी दिले ‘हे’ आश्वासन

Sharad Pawar

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) (ST) कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनाचा तिढा दिवाळीपूर्वी सोडविण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले असल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.

कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन देणे अशक्य झाले आहे. याशिवाय वेतन कराराच्या तरतुदींनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०१९पासून लागू झालेला वाढीव ५ टक्के महागाई भत्ता अद्याप एसटी कामगारांना लागू झालेला नाही. २०१८मध्ये लागू झालेला २ टक्के महागाई भत्ता व २०१९मध्ये लागू झालेल्या ३ टक्के महागाई भत्त्याची थकबाकीही एसटी कामगारांना मिळालेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER