दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी दिव्यांग धोरण-२०१८ : राजकुमार बडोले यांची माहिती

Rajkumar-Badole

मुंबई :- दिव्यांग व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने नव्याने धोरण आखले आहे. त्यात दिव्यांगांना शिक्षण, उत्तम आरोग्य, रोजगार व कौशल्य विकास साधण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. विशेष म्हणजे दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : नातवंडांना गोवर-रुबेला लसीकरण करुन आरोग्यमंत्र्यांचा सकारात्मक संदेश

दिव्यांगत्वाचे शीघ्र निदान करणे व दिव्यांगत्व शोधण्यासाठी आरोग्य तसेच संबंधित विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जातील. त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालयात सुविधा उभारण्यात येतील. दिव्यांगत्वावर मात करण्यासाठी शस्त्रक्रिया करणे,हिमोफिलिया आणि थॅलेसिमीया आजाराच्या उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कक्ष उभारले जाणार आहेत.

शैक्षणिक क्षेत्रातही विशेष प्राधान्य दिले जाणार असून, उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे. सर्व शिक्षण अभियानातही त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या गरजा लक्षात घेता शिक्षकांची नियुक्ती करण्यावर भर आहे. शिवाय पाच वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी ‘डे केअर मॉडेल’ शाळा उभारण्याला प्राधान्य राहणार आहे. दिव्यांगांना शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश दिले जातील. विशेष म्हणजे सार्वजनिक व खासगी क्षेत्रात दिव्यांगांना रोजगाराच्या समान संधीची हमी दिली असल्याचेही बडोले यांनी सांगितले.