गेल्या अनेक वर्षांपासून गायब आहे दिव्या भारतीचा नायक

Maharashtra Today

८० आणि ९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये (Bollywood)जवळ जवळ प्रत्येक शुक्रवारी नव्या कलाकारांची एंट्री होत असे. या दोन दशकात अनेक नवीन नायक-नायिका बॉलिवूडने प्रेक्षकांसमोर आणल्या होत्या. यापैकी काही हिट झाले तर काही लगेचच बॉलिवूडबाहेर फेकले गेले. बॉलिवुड बाहेर फेकले गेलेल्या या कलाकारांचे अधून मधून कुठे ना कुठे दर्शन होत असते. वेब सीरीजमुळे या अशा बाहेर गेलेल्या कलाकारांना काम मिळू लागले आहे. मात्र असेही काही कलाकार आहेत जे तेव्हा सुपरहिट झाले होते मात्र आज ते कुठे आहेत याची कोणालाही माहिती नाही आणि त्यांची माहिती काढावी असेही कोणाला वाटत नाही. बॉलिवूड हे उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे क्षेत्र आहे असे जे म्हणतात ते खरे आहे हे वारंवार सिद्ध होत आले आहे. ९० च्या दशकात असा एक कलाकार आला होता ज्याचा पहिला सिनेमा हिट झाला. तो घाऱ्या डोळ्याचा हा अभिनेता दिसायलाही सुंदर होता. सुपरस्टार बनण्याचे त्याच्यात सगळे गुण आहेत असेही म्हटले जात होते. पण नंतर तो कुठे गायब झाला ते कोणालाच ठाऊक नाही.

१९९२ मध्ये ‘दिल का क्या कसूर’ नावाचा एक सिनेमा आला होता. या सिनेमाची नायिका होती दिव्या भारती (Divya Bharati) आणि नायक होता पृथ्वी (Prithvi) नावाचा मुलगा. पृथ्वी दिसायला खूपच सुंदर होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला. या सिनेमातील ‘दिल जिगर नजर क्या है’, ‘गा रहा हूं इस महफिल में’ आणि ‘खता तो जब हो के’ ही गाणीही लोकप्रियतेच्या चार्टमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. या सिनेमातील दिव्या भारती आणि पृथ्वीची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. उगवता सुपरस्टार म्हणून पृथ्वीकडे काही निर्माते पाहू लागले होते. त्याला काही निर्मात्यांनी साईनही केले. पण दुर्देव असे की साईन केलेले सिनेमे तयार झाले नाहीत आणि दुसऱ्या निर्मात्यांनी पृथ्वीला नायकाच्या भूमिकांची ऑफरच दिली नाही. त्यामुळे पृथ्वीवर सेकंड लीड आणि कॅरेक्टर रोलच करावे लागले.

पृथ्वीने ‘मेरी आन’, ‘दिलवाले कभी ना हारे’, ‘इक्के पे इक्का’, ‘दरार’ असे काही सिनेमे केले. या सिनेमांमध्ये त्याच्या अभिनयाची प्रशंसाही झाली. पण नायक म्हणून त्याला काम कोणी देत नसल्याने चारच वर्षात म्हणजे १९९६ नंतर पृथ्वी सपोर्टिंग अॅक्टर म्हणून काम करू लागला. २००३ मध्ये एका निर्मात्याने त्याला नायकाची भूमिका देत ‘खंजर-द नाइफ’ सिनेमाची निर्मिती केली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला होता. त्यानंतर २००८ मध्ये पृथ्वीने मिथुन चक्रवर्तीच्या मुलाच्या महाक्षयच्या पहिल्या सिनेमात ‘जिम्मी’ मध्ये काम केले होते. हा पृथ्वीचा शेवटचा सिनेमा होता. त्यानंतर पृथ्वीचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. तो कुठे आहे, काय करतोय याची कोणालाही माहिती नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER