‘रेमडिसीवीर’चा पुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष; सरकारचा निर्णय

Remdesivir injection

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची (carona patients) संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी कोरोना लस, रेमडिसीवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आले आहे.

मात्र, रेमडिसीवीर इंजेक्शनचा (Remdesivir injection) पुरवठा सुरळीत होण्यासाठी राज्य सरकारने (State Govt) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता जिल्हास्तरावरच कंट्रोल रूमची उभारणी केली जाणार आहे. राज्यात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडिसीवीर इंजेक्शनची मागणी वाढत आहे. यात खासगी दुकानदार जास्त किमतीने इंजेक्शन विकत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. काही मेडिकलवरही कारवाई केली आहे. त्यामुळे ऑक्सिजन कंट्रोल रूममध्ये रेमडिसीवीरबाबत तक्रारी स्वीकारणार आहेत. या तक्रारीचे निवारण स्थानिक अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयामार्फत केले जाईल.

जिल्हापातळीवर समिती
खासगी दवाखान्यात औषधोपचारांचा वापर विशिष्ट पद्धतीने चालू आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरावर तांत्रिक समिती गठित केली जाईल. रेमडिसीवीरची गरज भासल्यास राज्यस्तरावरील FDAच्या कंट्रोल रूमशी संपर्क करून कारवाई होईल. जिल्हास्तरावर यासाठी कंट्रोल रूम स्थापन केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

रेमडिसीवीरचा काळाबाजार
सध्या रेमडिसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. तो रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी इंजेक्शन निर्मिती कंपन्यांशी नुकतीच बैठक घेतली. त्यात रेमडिसीवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक आणि काळाबाजार होऊ नये म्हणून इंजेक्शनवरील MRP कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button