जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण नाही – डॉ. संजय साळुंखे

Dr. Sanjay Salunkhe

सांगली :- सांगली जिल्ह्यात परदेशवारी करुन आतापर्यंत 403 व्यक्ती आलेल्या आहेत. यापैकी 371 व्यक्ती घरच्या अलगीकरण कक्षात असून 20 व्यक्तींचा 14 दिवसांचा अलगीकरण कालावधी पूर्ण झाला आहे. सद्यस्थितीत 12 व्यक्ती हॉस्पीटलमधील विलगीकरण कक्षात आहेत. यापैकी सांगली सिव्हील हॉस्पीटलमध्ये 7, मिरज सिव्हील हॉस्पीटल 2 आणि भारती हॉस्पीटलमध्ये 3 व्यक्ती आहेत. या व्यक्तींचे स्वॅब टेस्ट रिपोर्ट येणे बाकी आहे. सांगली जिल्ह्यात एकही व्यक्ती कोरोना विषाणू बाधीत नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.