
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गासाठी घाट फोडला असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात घाटात दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले असून पावसाळ्यात घेतात दरड कोसळून वाहतुकीला अपाय होऊ नये म्हणून वेळीच उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. गेल्या वर्षी परशुराम घाटात व अन्य घाटात दरडी कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे परशुराम घाट, कुंभार्ली घाट, कशेडी घाट, आंबा घाट आदी ठिकाणी वाहतूक पावसात सुरळीत चालू रहावी यासाठी संबंधित यंत्रणेनेे वेळीच नियोजन करावे असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला