… अन् संवाद सत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधानांपुढे केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक

CM Uddhav Thackeray-PM Modi

मुंबई : देशात कोरोना संकटाच्या (Corona Crises) पार्श्वभूमीवर राज्यांच्या घडामोडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष ठेवून आहेत. या पार्श्वभूमीवर मोदींसोबत पार पडलेल्या एका व्हर्च्युअल बैठकीत थेट जिल्हाधिकाऱ्याकडून उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह संबंधित राज्यातील ६० जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आहे.

यावेळी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Dr. Rajendra Bhosale) यांनी त्यांच्या जिल्ह्यात केलेल्या प्रयत्नांचे सादरीकरण पंतप्रधान मोदींपुढे केले . भोसले यांनी पंतप्रधानांसमोर मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. त्यांनी यावेळी म्हटलं की, मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा जिल्ह्याला चांगलाच फायदा झाला. त्याचबरोबर जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुडवडा जाणवत असताना सरकारच्या मदतीमुळं प्रशासन थेट ऑक्सिजन प्लांटपर्यंत पोहचू शकलं. त्याचबरोबर गावपातळीवर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांची विशेष मदत घेण्यात आली.

शिवाय कोरोनाबाधितांना गृहविलगीकरणात न ठेवता कोविड सेंटरमध्ये ठेवल्याचंही जिल्हाधिकारी भोसले यांनी पंतप्रधानांना सांगितले . पंतप्रधान यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भोसले यांच्या कामाचं कौतुक करताना म्हटलं की, कोरोनामुक्तीसाठी गावांनी राबवलेल्या यशस्वी प्रयोगाची देशपातळीवर अंमलबजावणी केली जाईल. तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणं आवश्यक असल्याचे ते म्हणाले. दरम्यान या संवाद सत्रात सांगली, वर्धा, नाशिक, चंद्रपूर, नागपूर, लातूर, कोल्हापूर, सोलापूर, बुलडाणा, सातारा, बीड, परभणी, पालघर, उस्मानाबाद, जालना आदी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. संबंधित व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button