रत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल करण्याचे भाजप शिष्टमंडळाला जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन

lOCKDOWN

रत्नागिरी/प्रतिनिधी : आजपासून पंधरा जुलैपर्यंत वाढवलेला लॉकडाऊन लवकरच शिथिल करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी भाजप शिष्टमंडळाला दिले. देशात व राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू असताना रत्नागिरी जिल्ह्यात मात्र सलग दुसर्‍यांदा लॉकडाऊन जाहीर झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे लोकभावना लक्षात घेऊन लॉकडाऊमध्ये शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मिश्रा यांची भेट घेऊन केली. त्यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यात काही निर्बंध ठेवून शिथिलता देऊ, असे आश्‍वासन दिल्याची माहिती भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली. गेल्या आठ दिवसांच्या लॉकडाऊनचा उपयोग न झाल्याने जिल्हाधिकार्‍यांनी आजपासून पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला. याबाबत चर्चा करण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्षांसह शहराध्यक्ष सचिन करमकर, सरचिटणीस बाबू सुर्वे आणि भाजयुमो शहराध्यक्ष विकी जैन यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली.

त्या वेळी अ‍ॅड. पटवर्धन यांनी जिल्हाधिकार्‍यांना लोकांची भावना सांगितली. 100 दिवस लॉकडाऊन झाल्यानंतर लोकांची मानसिकता जपण्याची गरज आहे. जनता नाराज आहे. व्यापार बंद आहे आणि अनेकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत. या सर्व भावना लक्षात घेऊन लॉकडाऊनमध्ये शिथिलता द्यावी, असे पटवून देण्यात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पटवर्धन यांना यशस्वी ठरले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER