जिल्हाधिकारी धान्य खरेदी केंद्रात आलेत शेतकऱ्याच्या वेशात

- कायदा तोडणाऱ्यांवर केली कारवाई

Anjaney Kumar Singh

रामपुर : धान्य खरेदी केंद्रातील व्यवहाराची माहिती घेण्यासाठी उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) रामपूरचे (Rampur) जिल्हाधिकारी आन्जनेयकुमार सिंह (Anjaney Kumar Singh) शेतकऱ्याच्या वेशात केंद्रात आले आणि कायदा तोडणाऱ्यांवर कारवाई केली! सामान्य शेतकरी दिसण्यासाठी आन्जनेयकुमार सिंह यांनी पायात हवाई चप्पल घातली आणि चेहऱ्यावर गमछा बांधला.

सरकारी मोटार बिलासपूर बाजार परिसरात असलेल्या धान्य खरेदी केंद्रापासून दूर उभी केली. भाड्याच्या वाहनाने शेतकरी म्हणून केंद्रावर गेलेत. तिथे सुरू  असलेल्या व्यवहारांवर लक्ष ठेवले आणि कायदा मोडून व्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. आन्जनेयकुमार सिंह यांच्यापाठोपाठ उपजिल्हाधिकारी आणि इतर अधिकारीही केंद्रावर पोचलेत आणि दोषींवर कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी केंद्रात आल्याचे कळल्यानंतर केंद्राच्या कर्मचाऱ्यांची  धावपळ सुरू झाली; पण तोपर्यंत उशीर झाला होता.

काही कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कारवाईचा फटका बसला. बिलासपूर एनसीसीएफच्या केंद्रावरील नियमांच्या उल्लंघन प्रकरणी केंद्राच्या प्रभारी अधिकाऱ्याविरुद्धही एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी आन्जनेयकुमार  म्हणालेत – केंद्रावरील कामाची खरी माहिती मिळण्यासाठी मला सर्वसामान्य व्यक्ती म्हणून केंद्रावर जाणे आवश्यक होते. म्हणून खासगी गाडीतून तेथे गेलो. बाजारात नियम पाळले जात आहेत की नाही हे जाणून घेणे आवश्यक होते. एका समितीचे गठन  करण्यात आले असून ती यांच्या कामावर लक्ष ठेवेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER