शेतकरी कामगारांच्या हितासाठी प्रहारच्या संदीप पांडे यांना विजयी करा -जिल्हाप्रमुख विठ्ठल देशमुख

नांदेड प्रतिनिधी : राज्यातील यापूर्वीचे आघाडी सरकार आणि आताचे महायुतीचे सरकार हे शेतकर्‍यांच्या धोरणाविरुद्ध आहे शेतकर्‍यांच्या जीवावर उठणारे हे सरकार आहे. त्यामुळे शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी प्रहार जनशक्ती चे उमेदवार संदीप पांडे यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख विठ्ठल देशमुख यांनी केले.

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती चे उमेदवार संदीप पांडे यांच्या प्रचारार्थ सायाळ, जैतापूर, वाघी, ढोकी या भागात घेण्यात आलेल्या प्रचार बैठकांमधून ते बोलत होते .पुढे बोलताना विठ्ठल देशमुख म्हणाले नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शेतकर्‍यांना पीक विमा मिळाला नाही .

त्याला या भागातील स्थानिक नेतृत्व जबाबदार आहे दहा वर्षाच्या काळात नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शेतकर्‍यांच्या शेतीसाठी सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यात विद्यमान आमदाराला यश आले नाही नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही महिलांच्या हाताला काम मिळाले नाही अर्धाअधिक भाग शहरात असतानाही कामासाठी येथील युवकांना भटकंती करावी लागत आहे ही परिस्थिती बदलायची असेल तर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून लोक सेवेची तळमळ असणार्‍या संदीप पांडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहनही विठ्ठल देशमुख यांनी केलं