जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनेच रेमडेसिवीरचे वाटप; सेनेच्या नेत्याकडून स्पष्टीकरण

remdesivir injection - Chandrakant Raghuvanshi - Maharashtra Today
remdesivir injection - Chandrakant Raghuvanshi - Maharashtra Today

नंदुरबार : जिल्ह्यातील कोविड रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून रीतसर परवानगी घेऊनच रेमडेसिवीर इंजक्शनचे वाटप केले गेले, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuvanshi) यांनी पत्रकार परिषदेत दिले. मी करत असलेल्या विकासासाठी त्यांचे असलेले व्हिजन यामुळे खासदार डाॅ. हिना गावित व आमदार डाॅ. विजयकुमार गावित यांना राजकीय प्रतिस्पर्धी वाटू लागले आहेत. त्यामुळेच ऊठसूट त्यांच्यावर आरोप करून रेमडेसिवीरचे राजकारण केले जात असल्याचा आरोप चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, खासदार डाॅ. हिना गावित यांनी किती रेमडेसिवीर आणले, कुठे वाटले, कितीची बिले होती याचे पुरावे द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

खासदार डाॅ. हिना गावित यांनी यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर आरोप केले होते. त्यावर रघुवंशी यांनी सांगितले की, जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी सुरू असलेली कामे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चांगली आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत बोलताना रघुवंशी यांनी सांगितले की, थेट रुग्णालयांना रेमडेसिवीर पुरविण्याचा शासनाचा निर्णय झालेला नसताना आपण रोटरी वेलनेस सेंटरच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडून एक हजार इंजेक्शन उधारीच्या बोलीवर घेतले. त्यासाठी आरोग्य विभागाची रीतसर मान्यता आहे. त्यासाठी डिपॅाझिटमधून ५ लाख ९४ हजार रुपयांचा चेक जमा केला आहे.

१६ एप्रिल रोजी शासनाचा थेट रुग्णालयांना इंजेक्शन पुरविण्याचा आदेश काढण्यात आला असून, खासदार डाॅ. गावित खोटे बोलून ते रेटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कोविडच्या आधी आकांक्षित जिल्हा विकासासाठी जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांचे प्रयत्न चांगले आहेत. आदिवासी समाजाचे अधिकारी असल्याने त्यांना आदिवासींच्या समस्या, प्रश्न माहीत आहेत. त्यांच्या कामाचा धडाका पाहता गावित परिवाराला ते नंदूरबार लोकसभा मतदारसंघात व जिल्ह्यात राजकीय प्रतिस्पर्धी वाटू लागले आहेत. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांना पाण्यात पाहण्याचे काम गावित पिता-पुत्री करीत असल्याचेही रघुवंशी यांनी स्पष्ट केले. खासदार डाॅ. गावित व आमदार विजयकुमार गावित यांनी कुठून आणि किती इंजेक्शन्स  आणले, त्यांची बिले कुठे आहेत, किती दवाखान्यांना दिले, कुठल्या पेशंटला दिले याची कागदपत्रे दाखवून दिली तर आपण नंदूरबार सोडून जाऊ, असे आवाहन त्यांनी दिले.

खासदार बनण्याच्या आधी मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरे घेतली. खासदार झाल्यानंतर कुठले आरोग्य शिबिर घेतले ते दाखवून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्ह्यात व राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचाराचे आरोप असलेला कुणी नेता व कुठले घराणे असेल तर ते गावित परिवार आहे. त्यांनीच आपल्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करावा हे मोठे दुर्दैव आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर डाॅक्टरांची कमतरता आहे. असे असताना स्वत: खासदार व त्यांची लहान बहीण एम.डी. डाॅक्टर असताना ते सेवा देऊ शकत नाहीत  हे जिल्ह्याचे दुर्दैव असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आपण राजकारणात येणार नाही हे एकदा स्पष्ट करून दिले तर गावित परिवाराला शांतता लाभेल, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button