शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त कोविड किट्स वितरण आणि भोजनदान

Shahrukh Khan Birthday

मुंबई : अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा ५५ वा वाढदिवस आज (२ नोव्हेंबर ) त्याचे चाहते ५५५५ कोविड किट्स (Covid Kits) व ५५५५ लोकांना भोजनदान करून साजरा करणार आहेत.

याबाबत माहिती देताना एसआरके युनिव्हर्सचे सहसंस्थापक यश परियानी म्हणाले की, आम्ही हेल्पिंग मोहीम सुरू केली आहे यात लोक कपडे, इलेक्ट्रॉनिक सामानासह काहीही वस्तू मदतीत दान देऊ शकतात. ज्यांना गरज आहे पण विकत घेऊ शकत नाहीत अशा ५५५५ गरजवंतांना कोविड किट्सची मदत करू. ५५५ हा आकडा शाहरुख खानसाठी शुभ असल्याने आम्ही दानासाठी ५५५५ आकड्याची निवड केली आहे.

आम्ही ५५५५ लोकांना अन्नदानही करणार आहोत.शाहरुख पृथ्वीच्या गोलावर ‘सब ठीक हो जायेगा’ गाण्याच्या पोझमध्ये उभा आहे, असा खास केक या वाढदिवसासाठी तयार करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER