वक्तव्याचा विपर्यास केला; राजकीय आयुष्यात ब्राम्हण समाजाचा आदरच केला, खडसेंची दिलगिरी

Eknath khadse

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्यावर टीका करताना ब्राह्मण समाजाचा उल्लेख करुन आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यावरुन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ (Brahmin Mahasangh) तसंच ब्राह्मण समाज आक्रमक झाला. एकनाथ खडसे यांनी याप्रकरणी त्वरित माफी मागावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केल्यानंतर एकनाथ खडसेंनी ट्विटरवरून दिलगिरी व्यक्त केली आहे. (Eknath Khadse Clarification on his Statement brahmin Community)

“माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे, असं सांगत झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो”, असं ट्विट एकनाथ खडसे म्हणाले. यासदंर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

एका ब्राह्मणाला मी मुख्यमंत्रिपदाचं दान दिलं, असं जाहीर वक्तव्य करुन एकनाथ खडसेंनी वाद ओढवून घेतला होता. खडसेंच्या वक्तव्यानंतर ब्राह्मण महासंघाने तीव्र आक्षेप नोंदवून त्यांनी आपले विधान त्वरित मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी दिला होता. महासंघाच्या इशाऱ्यानंतर खडसेंनी फेसबुक पोस्ट लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER