वाढीव वीज बिलाच्या बोजामुळेच असंतोष

corona lockdown electricity bills at Kolhapur

पुणे : कोरोना (Corona) संसर्ग टोकावर असतानाच्या काळात ग्राहकांना अंधारात ठेवून महावितरणने १५ टक्के वीजदरवाढ केली. या वाढीव दराच्या फरकासह वीज बिले काढली गेल्याने ती तिप्पट-चौपट वाढली. राज्यातील २ कोटी ७३ लाख वीज ग्राहकांपैकी जवळपास दीड कोटी ग्राहक हा मासिक ० ते १०० युनिट वीज वापरणारा आर्थिकदृष्ट्या कमजोर गटातील आहे. मासिक १०१ ते ३०० युनिटपर्यंत वीज वापरणारा ग्राहक प्रामुख्याने मध्यमवर्गीय गटातील आहे.

त्यांची संख्याही ५० लाखांच्या घरात आहे. आज अवाजवी वीज बिलांबद्दल असंतोषाचा जो भडका उडाला आहे, तो प्रामुख्याने या दोन गटांतील आहे. लॉकडाऊनपूर्वी ० ते १०० युनिट वीज वापरकर्त्या ग्राहकांसाठी विजेचे दर ९० रुपये मासिक स्थिर आकार आणि प्रतियुनिट ३.०५ रुपये असे होते. या हिशेबाने या गटातील ग्राहकांची मासिक बिले फार तर ४०० रुपयांच्या आसपास असायची. १०१ ते ३०० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या ग्राहकांसाठी मासिक ९० रुपये स्थिर आकार आणि प्रतियुनिट ६.९५ रुपये असे विजेचे दर लॉकडाऊनपूर्वी होते.

त्यामुळे या वर्गातील ग्राहकांची बिले ७०० ते २००० रुपयांपर्यंत असायची. मासिक साधारण ४०० ते २००० रुपयांपर्यंत वीज बिले भरणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या वीज बिलाबाबतच सध्या मुख्य त्रांगडे झाले आहे. या ग्राहकांना नेहमीपेक्षा दुप्पट ते चौपट बिल आल्याच्या तक्रारी आहेत. महावितरणने वीज नियामक आयोगाच्या परवानगीनुसार १५ टक्के दरवाढ लागू केली असली तरी या वर्गातील ग्राहकांची बिले ४६० ते २३०० रुपयांच्या पर्यंत  आकारणी होणे आवश्यक होते. पण तसे न होता चुकीच्या दराने आकारणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER