शिक्षक, पदवीधर निवडणूक: महाविकासआघाडीतील पक्ष स्वबळाच्या तयारीत?

Mahavikas Aghadi-balashaeb thorat

मुंबई : येत्या १ डिसेंबर रोजी होणार्‍या विधानपरिषदेच्या ५ जागांची निवडणूक महाविकास आघाडीत (MVA Govt) बिघाडी होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या निवडणुका जाहीर होऊन अजूनही जागांचे वाटप ठरले नाही, १२ तारखेपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. मात्र, मात्र अद्याप महाविकास आघाडीत या जागांच्या वाटपाची चर्चा झालेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटप नेमकं अडलं कुठं असा प्रश्न विचारला जात आहे.

अमरावती शिक्षक मतदार संघातील सद्य आमदार श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांना शिवसेनेकडून उमेदवारी अपेक्षा आहे. पण त्याला काँग्रेसचा विरोध आहे. स्थानिक काँग्रेसकडून वेगळा उमेदवार देण्याचा आग्रह आहे. स्थानिक काँग्रेसकडून ही जागा काँग्रेसच्या पारड्यात यावी म्हणून मागणी आहे.

पुणे शिक्षक मतदार काँग्रेसला हवा आहे. याआधी आघाडीमध्ये काँग्रेसकडे ही जागा होती. त्या जागेवर दत्तात्रेय सावंत हे आता सद्य आमदार आहेत. दत्तात्रेय सावंत यांचा पक्ष ठरत नाही की ते काँग्रेसकडून निवडणूक लढवणार की राष्ट्रवादीतून जागा लढवणार. हे ठरत नसताना पुणे शिक्षकांसाठी नुकतीच कोल्हापुरात काँग्रेसने बैठक घेतली. यात ईच्छुकांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या आहेत.

पुणे पदवीधर राष्ट्रवादी लढणार आहे. सध्या या जागेवर दत्तात्रय सावंत हे आमदार होते. त्यांना मागील निवडणुकीत काँग्रेसने पाठिंबा दिला होता. इथे शिवसेना आणि काँग्रेस त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे, इथे भाजपकडून चंद्रकात पाटील आमदार होते. औरंगाबाद आणि नागपूर पदवीधर बाबत महाविकास आघाडीत वाद नाही. नागपूर पदवीधर काँग्रेस लढवण्याची शक्यता आहे. तर औरंगाबाद पदवीधर सतीश चव्हाण राष्ट्रवादीकडून लढवणार आहेत. अर्ज भरायला आता केवळ ४ दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीत जागा वाटपाची अद्याप चर्चा झालेली नाही. या चार दिवसात चर्चेतून मार्ग निघतो का ते बघावे लागेल.

ही बातमी पण वाचा : हे सरकार तुमचं, मुंबईच्या विकासासाठी टीकेची पर्वा करणार नाही : मुख्यमंत्री ठाकरे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER