उजनी धरणाच्या पाण्याचा वाद चिघळला, शरद पवारांच्या ‘गोविंद बागे’ची सुरक्षा वाढवली

Maharashtra Today

पुणे : उजनी धरणक्षेत्र( Ujani dam water)परिसरातील पाच टीएमसी पाण्याच्या उपशावरून पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यात संघर्ष सुरू झाला आहे. अवर्षणप्रण क्षेत्रातील आणि रखडलेली म्हणून इंदापूर तालुक्याला मंजूर झालेली योजना पाणी वाटप योजनेत बसत नसल्याचे सांगत सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या विरोधाने रद्द झाली आहे. या योजनेचे भवितव्य आता राज्य सरकारच्या हाती आहे. कोणताही निर्णय झाल्यास एक गट नाराज झाला असून, आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या बारामतीमधील ‘गोविंद बागे'(Govind Bage)समोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ‘गोविंद बागे’ची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

उजनीच्या पाणी प्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करणार होते. सोलापूर जिल्ह्यातील लोकं आंदोलन करणार आहेत, असं समजताच पोलिसांनी गोविंद बागेबाहेर सुरक्षा वाढवली आहे. दोन आंदोलकांना बारामतीत पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे. दरम्यान, उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी उचलण्याचा निर्णय जयंत पाटील यांनी रद्द केल्यानंतर इंदापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. इंदापूर तालुक्यातील शेतकरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पीपल्स रिपब्लिकन पक्ष यांच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे पुणे सोलापूर हायवे वर टायर जाळत रस्ता रोको केला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button