आमटे घराण्यात संपत्तीवरुन वाद, आमटे बंधूनी जारी केले परिपत्रक

Prakash Baba Amte

चंद्रपूर : बाबा आमटे (Baba Amte) यांच्या घराण्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. शीतल आमटे (Sheetal Amte) यांनी आनंदवनचा पूर्ण ताबा घेऊन बाकीच्यांना बेदखल केले होते. मात्र आता विकास आमटे (Vikas Amte) प्रकाश आमटे (Prakash Amte) हे दोघे बंधू एकत्र येत त्यांनी शीतल या मानसिक रुग्ण असल्याचे सांगत त्यांना बाजूला केले आहे. याबाबतचे परिपत्रक आमटे बंधूनी जारी केले आहे.

प्रख्यात समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांच्या परिवारातील वादावर शेवटी परिवारातील प्रमुख व्यक्तींनी एक संयुक्त निवेदन मंगळवारी जारी केले. सोबतच बाबा आमटे यांनी दाखवलेल्या मार्गावर महारोगी सेवा समिती काम करत राहील अशी ग्वाही दिली. या निवेदनावर डॉ. विकास आमटे डॉ.भारती आमटे, डॉ.प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या सह्या आहेत. शीतल आमटे या डॉक्टर विकास आमटे यांच्या कन्या आहेत.आमटे घराण्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. शीतल आमटे यांनी आनंदवनचा पूर्ण ताबा घेऊन बाकीच्यांना बेदखल केले होते. मात्र आता विकास आमटे प्रकाश आमटे हे दोघे बंधू एकत्र येत त्यांनी शीतल या मानसिक रुग्ण असल्याचे सांगत त्यांना बाजूला केले आहे. प्राप्त माहितीनुसार शीतल आणि त्यांचे बंधू कौस्तुभ यांच्यातही वारंवार खटके उडत होते शीतल आणि त्यांचे पती गौतम करजगी यांचे वरोऱ्याच्या महारोगी संस्थेत वरचष्मा होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER