ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून वाद

Maratha Reservation - Jaidatta Kshirsagar

अहमदनगर : आरक्षणासाठी मराठा समाज (Maratha Community Reservation) आग्रही असताना राज्यभरात विविध आंदोलने सुरू आहेत. तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) देण्याची मागणीदेखील जोर धरू लागली आहे. ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची हरकत नाही, मात्र ओबीसी आरक्षणात ढवळाढवळ न करता त्यांना आरक्षण द्यावे.’ अशी मागणी शिवसेनेचे (Shiv Sena) नेते जयदत्त क्षीरसागर (Jaidatta Kshirsagar) यांनी केली आहे. तेली समाजाच्यावतीने राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन राहाता येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलले.

या मेळाव्यासाठी काँग्रेसचे (Congress) आमदार अभिजित वंजारी (Abhijit Wanjari) तसेच माजी आमदार शिवाजी चोथे (Shivaji Chothe) हे उपस्थित होते. ओबीसीसाठी असलेल्या केंद्राच्या २७ टक्के आरक्षणाचे वर्गीकरण होऊन मागासवर्गीय तेली समाजाला समाविष्ट करावे. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, तसेच तेली समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, अशा मागण्या क्षीरसागर यांनी या मेळाव्यात केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER