मोफत लस देण्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी ; राष्ट्रवादीच्या घोषणेने मतभेद ?

Maharashtra Today

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात सरसकट लोकांना कोरोना लस मोफत द्यायची याबबात राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी घोषणा केल्याने महाविकास आघाडीतील (MVA)बाकी मंत्र्यांमध्ये नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

सूर असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. मोफत लस (free-corona-vaccine) सर्वांना द्यावी याबाबत ही मंत्र्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील गरीब जनतेला लस मोफत देण्यात यावी याबाबत मंत्र्यांमध्ये एकमत आहे. पण ज्या वर्गाला पैसे देऊन लस घेता येईल, त्यांनी ती विकत घ्यावी अशीही काही मंत्र्यांची भूमिका आहे. राज्यात वय वर्ष 18 ते 45 मध्ये पाच कोटी नागरिक येतात. याचा अर्थ या नागरिकांना 10 कोटी लसींचे डोस लागणार आहेत. सरसकट सगळ्यांना लस मोफत द्यायची झाली तर साधारण राज्य सरकारवर चार हजार कोटींचा आर्थिक भार येऊ शकतो. त्यामुळे सरसकट लस सगळ्यांना मोफत देण्याऐवजी फक्त गरिबांनाच लस मोफत द्यावी, तर दुसरीकडे ज्यांना परवडत त्यांनी पैसे देऊन लस घ्यावी अशी काही मंत्र्यांची भूमिका आहे .

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) राज्यात मोफत लस देईल आणि याबाबत केबिनमध्ये निर्णय होईल असे बोलून दाखवले त्यानंतर मग सायंकाळी शिवसेनेचे नेते कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महाराष्ट्रातील जनतेला लस देणे सरकारची भूमिका आहे, त्यामुळे लोकांना मोफत लस देण्याचे सूचक वक्तव्य केले होते. पण काही क्षणातच आदित्य ठाकरे यांनी स्वतःचे पहिले ट्विट डिलीट केले.

ही बातमी पण वाचा : ‘हा’ तर ठाकरे सरकारचा कोव्हीड भ्रष्टाचार ; किरीट सोमय्यांची टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button