पवार कुटुंबातील वाद मिटला?, खुद्द पार्थ पवार आजोबा शरद पवारांना भेटले

Partha Pawar-Sharad Pawar

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशी मागणी पार्थ पवार (Parth Pawar) यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष आणि आजोबा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पार्थ पवार यांचे कान टोचले होते. पवार यांनी थेट प्रसारमाध्यमांसमोर नातू पार्थ पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पवार कुटुंबात एक नवा वाद उफाळून आला आहे. शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर अपरिपक्व म्हटलं होतं. तसेच, आम्ही पार्थच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत देत नाही, असंही शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत अनेक राजकीय घडामोडींना वेग आला.

याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार हे मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा आज राजकीय वर्तुळात रंगल्या. पवार कुटुंबात वाद उद्भवल्याची चर्चा होताच खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थिची भूमिका घेत पार्थ पवारांना थेट शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर बोलावून घेतलं. आता सुप्रिया सुळे यांनीच मध्यस्थी घेतल्यानंतर आता या वादावर पडदा पडला असे बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER