पक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारलाय; राडेबाज कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळेंचा दम

Supriya Sule Programme Aurangabad Paithan

मुंबई :- मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची महिती आहे . संजय वाकचौरे आणि दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांनी सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीतच गोंधळ घातला. संतापलेल्या सुप्रिया सुळे यांनी हा पक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारला आहे. पक्षाला कुणी बदनाम कराल तर गाठ माझ्याशी आहे असा दम भरल्याची माहिती आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादीमधील गटबाजी समोर आली. संजय वाकचौरे आणि दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांनी कार्यक्रमात गोंधळ घातला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी तुफान घोषणाबाजी करत राडा घातला. यावेळी सुप्रिया सुळे यांनाही काही काळ भाषण थांबवावं लागलं. संजय वाकचौरे आणि दत्ता गोर्डे या दोघांमध्ये विधानसभेच्या तिकीटवरुन नाराजी होती. संजय वाकचौरे यांनी पक्षाकडे तिकीट मागितलं होतं, परंतु दत्ता गोर्डे यांना पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे वाकचौरे यांचे समर्थक नाराज होते.

दरम्यान, राड्यानंतर सुप्रिया सुळे यांनी वाकचौरे आणि गोर्डे या दोघांनाही गाडीत बसून जायला सांगितले. तसेच यामुळे काही काळासाठी सुळे यांना कार्यक्रम थांबवावा लागला. सुप्रिया सुळे या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन करत होत्या .