पार्थला पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी नाकारल्यावरून पवारांच्या घरात भडकला वाद?

Ajit pawar-Parth Pawar-Sharad Pawar

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) सुरू असलेल्या घडामोडींमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर पार्थ अपरिपक्व असून, त्यांच्या मागणीला कवडीचीही किंमत देत नाही, असे खळबळजनक विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) हे दोन नेते समोरासमोर येण्याची शक्यता आहे. मात्र शरद पवारांनी पार्थबद्दल एवढी टोकाची भूमिका का घेतली याबाबतची माहिती पुढे आली आहे.

पदवीधर मतदारसंघात पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह अजित पवार यांचा होता. पण त्यालादेखील शरद पवार यांनी विरोध केला. पदवीधर मतदारसंघात पार्थ पवार यांना उमेदवारी देता येणार नाही, ही भूमिका शरद पवार यांनी घेतली. त्यावरून वाद निर्माण झाला, असं मत ज्येष्ठ पत्रकार संजय भोकरे यांनी ‘टीव्ही-९ मराठी’ सोबत बोलताना व्यक्त केलं आहे.

दरम्यान, पुणे (Pune) पदवीधर मतदारसंघातून गेल्या वेळेस क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड यांचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण लाड राष्ट्रवादीकडून इच्छुक होते; पण त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नव्हती. मग त्यांनी पुरोगामी चळवळ, डावे पक्ष इतर संघटनेच्या बळावर उमेदवारी मिळवली होती. त्यावेळी त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. यावेळेस ते इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे गेल्या वेळेचे उमेदवार सारंग पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने अरुण लाड यांचा दावा प्रबळ मानला जात असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER