भय्यू महाराजांच्या आईच्या अंत्यसंकरावरून कन्या आणि सावत्र आईचा समशानभूमीत वाद!

नवी दिल्ली : भय्यू महाराजांची (Bhayyu Maharaj) आई कुमुदिनी देवी यांचे शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. अनेक दिवसांपासून इंदौरमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आजीच्या निधनाची बातमी मिळताच रविवारी कुहू पुण्याहून इंदौरला आली. सरळ मुक्तिधाममध्ये गेली. तिने आजीवर अंत्यसंस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली.

मात्र, भय्यूजी महाराजांची दुसरी पत्नी आयुषीने तिला अंत्यसंस्कार करू दिले नाही. अनेक दोघींचा वाद सुरू होता.

कुहू रविवारी दुपारी तीन वाजता इंदौरमध्ये दाखल झाली. स्मशानभूमीत जाताच ती आयुषीला म्हणाली की, आजोबा आणि वडील भय्यूजी महाराज यांचे अंतिम संस्कारही मी केले होते, त्यामुळे हिंदू रितीप्रमाणेच कुमुदिनीदेवी यांच्यावरही मीच अंत्यसंस्कार करणार. मात्र, कुहू तिथे एकटी पडली. आयुषीच्या सोबत असलेल्या लोकांनी कुहूला अंत्यसंस्कार करू दिले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button