पडकळकर भाजपमध्ये गेले असले, तरी निवडणुकीनंतर परत येतील : आंबेडकरांचा टोला

मुंबई : लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचे उमेदवार असलेले गोपीचंद पडळकर पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आमेबडकर यांनी भाष्य केले .पडकळकर भाजपमध्ये गेले असले, तरी निवडणुकीनंतर परत येतील, असा टोला आंबेडकरांनी लगावला. ते पत्रकार परिषेत बोलत होते .

एमआयएम सोबत काडीमोड घेतल्या नंतर वंचित आघाडीने विधानसभा निवडणुकीला स्वतंत्र लढण्याचा निर्धार केला आहे. विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार देणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. आतापर्यंत वंचितने एकूण १९९ उमेदवारांची घोषणा केली आहे. उमेदवारीच्या माध्यमातून आजवर वंचित आणि दुर्लक्षित राहिलेल्या समूहांना संधी देण्याचे वंचितचे धोरण असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

आज वंचित आघाडीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत 120 जणाच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे . पहिल्या यादीत 22 जणांची नावं होती. त्यामुळे वंचितने आतापर्यंत 142 उमेदवार जाहीर केले आहेत. उर्वरित उमेदवारही लवकरच जाहीर केले जाणार आहेत. या यादीमध्ये ही यादी जाहीर करताना उमेदवारांच्या जातीचाही वंचितने उल्लेख केला आहे.