पाठलाग करून विवाहितेचा विनयभंग

औरंगाबाद : दुचाकीवर मुलीसह जाणाऱ्या विवाहीतेचा पाठलाग करुन तिचा विनयभंग करणाऱ्या बुलेट चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला १२ फेबु्रवारी रोजी दुचाकीवर मुलीला घेवुन घरी परतत असतांना ़ऋषिकेश निकस याने बुलेट क्रमांक ( एमएच-४१-एजे-०३३३) वरून पीडित महिलेचा पाठलाग करत तिच्या घराजवळ आला. पीडित महिला घराजवळ गाडी उभी करीत असतांना ऋषिकेश निकस याने तिची छेड काढुन विनयभंग केला. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन बुलेटस्वाराविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसेने फक्त झेंडा बदलला आहे; आमची भूमिका तीच