केरळ विमान दुर्घटना दुर्दैवी ; शरद पवारांनी ट्वीट करुन व्यक्त केले दु:ख

Kerela Plane Crash - Sharad Pawar

मुंबई : दुबईहून(Dubai) १९१ प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे(Air India Express) विमान केरळमधील कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर(Kozhikode International Airport) उतरताना धावपट्टीवरून घसरल्याने शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत मुंबईतील वैमानिकासह १७ जणांचा मृत्यू, तर १२३ प्रवासी जखमी झाले. या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केले आहे.

कोझिकोड विमान अपघाताची बातमी ऐकून दुःख झाले . या अपघातात जीव गमावलेल्यांच्या कुटूंबियांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो . जखमीनींनी लवकर बरे व्हावे , अशी प्रार्थना करतो , असे ट्विट शरद पवारांनी केले आहे .

दरम्यान कोझिकोड येथे झालेल्या अपघातात देशाने दोन शूर पायलट गमवले. अपघातात 59 वर्षीय दीपक वसंत साठे आणि 33 वर्षीय कॅप्टन अखिलेश कुमार यांचा मृत्यू झाला. दीपक साठे यांची गणना देशातील सर्वोत्तम वैमानिकांमध्ये केली जाते.

ही बातमी पण वाचा : केरळ विमान दुर्घटना: वैमानिक आणि सह-वैमानिकांसह 18 जणांचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER