
नवी दिल्ली : केंद्रीय कृषि कायद्याविरोधात अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंततराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने केलेल्या ट्विटर टूलकिटप्रकरणी दिशा रविला अटक करण्यात आले. याप्रकरणात पाकिस्तानने उडी घेतली आहे. दिल्लीत प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. या रॅलीला हिंसक वळण आले. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पाकिस्तानशी संबंध असल्याचे उघडकीस केले होते. यानंतर ट्विटर टूलकिटप्रकरणी इमरान खान यांच्या पक्षाने दिशा रविला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.
इमरान खानचा पक्ष नेमके काय म्हणतो?
भारतात मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार यांच्याविरोधात गेलेल्या प्रत्येकाला गप्प करण्यावर विश्वास ठेवते. क्रिकेटपटू आणि बॉलिवूडमधील दिग्गजांचा उपयोग करून घेणे लज्जास्पद होते. ट्रॅक्टर रॅली हिंसाचारात दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानचा संबंध उघड केल्यास दिशा रविला पाठिंबा देऊन मोदी सरकारवर इमरान खानच्या पक्षाने टीका केली आहे.
जर २२ वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर भारताचा पाया नक्कीच हादरला आहे. शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठीचे टूलकिट भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चीनी सैनिकांपेक्षाही धोकादायक झाले आहे, असा आरोप राज्यसभा सदस्य पी. चिदंबरम यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला. तसेच काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी देखीलदिशाच्या अटकेचा विरोध केला आहे. “कार्यकर्त्यांना जेल आणि दहशतवाद्यांना बेल” असे म्हणत मोदी सरकारवर टीका केली आहे. या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही दिशा रवि अटक प्रकरणी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला