टूलकिटप्रकरणी दिशा रविची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Disha Ravi

दिल्ली : सध्या टूलकिटप्रकरण चर्चित आहे. याप्रकरणी २१ वर्षीय पर्यावरणवादी दिशा रवी हिला दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली होती. त्यामुळे देशातील अनेक तरुणमंडळी याला निषेध करत आहेत. फक्त तरुण मंडळीच नाही तर राजकीय पक्ष नेत्यांपासून ते बॉलिवूड कलाकर दिशाच्या अटकेचा निषेध करताना दिसत आहेत. आज पटियाला न्यायालयाने दिशाची ३ दिवसांच्या न्यायलयीन कोठडीत रवानगी केली आहे. यापूर्वी दिशाला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER