रेड बिकिनीतील दिशा पटानीचे फोटो झाले व्हायरल

Disha Patani

प्रख्यात अभिनेता टायगर श्रॉफची (Tiger Shroff) गर्लफ्रेंड म्हणून ओळखली जाणाऱ्या दिशा पटानीचे (Disha Patani) युवासेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याशीही नाव जो़डले गेले होते. परंतु त्या दोघांत तसे काही नाही असे स्पष्ट करण्यात आले. सध्या दिशा आणि टायगर एकत्रच आहेत. दिशा मालदीवमध्ये सुट्टी साजरी करण्यासाठी गेली असून नुकताच टायगर श्रॉफही मालदीवला पोहोचला आहे. टायगरचे फक्त चड्डीवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले असतानाच दिशा पटानीचेही रेड बिकीनीतील फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेले आहेत.

स्वतः दिशा पटानीनेच सोशल मीडियावर बिकीनीतील विविध पोजमधील फोटो शेअर केले आहेत. फोटोंसोबत तिने सूर्याचा इमोजीही टाकला आहे. तिच्या या फोटोंना फॅन्स लाईक करीत असून कमेंटही देत आहेत.

सुट्टी साजरी केल्यानंतर टायगर आणि दिशा त्यांच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहेत. या दोघांनी त्यांच्या संंबधांबाबत अजून वाच्यता केली नसली तरी या दोघांचे संबंध असल्याचे म्हटले जाते. दिशाच्या फोटोवर टायगरची आई आणि बहिण कमेंट करीत असतात. टायगरह दिशाच्या फोटोवर कमेंट करीत तिला सल्ले देत असतो.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER