‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये जॉन अब्राहमसोबत दिसणार दिशा पटानी

Ek Villain Returns

बॉलिवूडमध्ये (Bollywood) एखादा सिनेमा हिट झाला आणि निर्मात्याने त्याची फ्रेंचाईजी तयार करण्याची योजना आखली की सिनेमातील मूळ मुख्य कलाकारांनाच बहुतेक दुसऱ्या भागात संधी दिली जाते. एखादा कलाकाराचा सिनेमात मृत्यू झालेला असला तर त्याच्या जागी दुसरा कलाकार घेतला जातो. पण कधी कधी निर्माता हिट सिनेमाचा सिक्वेल करताना मूळ कलाकारांनी संधी न देता दुसऱ्याच कलाकारांना घेतो आणि सिनेमा तयार करतो. अरशद वारसीचा (Arshad Warsi) हिट सिनेमा जॉली एलएलबी हिट झाला होता पण जेव्हा याचा सिक्वेल तयार करण्यात आला तेव्हा मात्र अरशदच्या जागी अक्षयकुमारला घेण्यात आले होते. आता अगदी तसेच एक व्हिलन सिनेमाबाबतही झाले आहे.

2014 मध्ये रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूर अभिनीत ‘एक व्हिलन’ Ek Villain सिनेमा रिलीज झाला होता. रितेश देशमुखने या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली होती. त्याने प्रेक्षकांना चांगलेच प्रभावित केले होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. आता सात वर्षानंतर या सिनेमाचा सिक्वेल बनवण्याची योजना आखण्यात आली आहे. सिनेमाचे नाव ‘एक व्हिलन रिटर्न्स’ Ek Villain Returns ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे सिनेमाची फक्त योजनाच आखण्यात आली आहे असे नाही तर याच्या रिलीजची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. पुढील वर्षी 11 फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज केला जाणार असल्याचे या सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांनी सोशल मीडियावर जाहीर केले आहे.

टी सीरीज आणि बालाजी फिल्म्स या सिनेमाची निर्मिती करणार असून दिग्दर्शनाची जबाबदारी मोहित सूरीवरच सोपवण्यात आलेली आहे. मोहितनेच मूळ एक व्हिलन EK Villain सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. एक व्हिलन रिटर्न्स या सिनेमात मात्र मोहितने जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि दिशा पटानी (Disha Patani) यांना घेतले आहे. जॉन अब्राहमने (John Abraham) या सिनेमाचा टीझर पोस्टर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करीत 365 दिवसानंतर सिनेमा रिलीज होणार असून इस कहानी का हीरो व्हिलन है असे म्हटले आहे तर निर्मात्री एकता कपूरने, हीरो व्हिलन कहानी फिर करे शुरु असे म्हणत तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सिनेमाचा टीझर पोस्टर रिलीज केला आहे. दिशा पटानीनेही सोशल मीडियावर या सिनेमाबाबत लिहिले आहे, यावेळीही प्रेक्षकांना तक्रार करण्याची संधी मिळणार नाही असे म्हटले आहे.

एकूणच सिनेमाने घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली असून जॉन अब्राहम, अर्जून कपूर आणि दिशा पटानी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना किती आवडते ते सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेलच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER