भावी सासऱ्याची लहान बहिण बनली ही अभिनेत्री

Disha Patani and Jackie Shroff together in Radhe movie

बॉलिवुडमध्ये (Bollywood) कलाकारांची नाती वेगळी असतात आणि पडद्यावर त्यांना वेगळ्या भूमिका साकाराव्या लागतात. अशी उदाहरणे फार नाहीत मात्र कधी कधी अशी उदाहरणे आढळतात. आता एक असे उदाहरण दिसणार आहे जे खरोखर अत्यंत वेगळे आहे. सध्या लोकप्रिय असलेल्या एका अभिनेत्रीने तिच्या आगामी चित्रपटात तिच्या भावी सासऱ्याच्या लहान बहिणीची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा आहे सलमान खानचा बहुचर्चित राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई. आणि हे कलाकार आहेत दिशा पटानी आणि जॅकी श्रॉफ.

दिशा पटानी (Disha Patani) आणि जॅकीचा (Jackie Shroff) मुलगा टायगर श्रॉफ हे बॉलिवुडमध्ये एक प्रेमी जोडपे म्हणून ओळखले जात आहे. मुंबईपासून मालदिवपर्यंत हे दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. जॅकी श्रॉफच्या घरगुती कार्यक्रमांमध्येही दिशा पटानी सहभागी होत असते. मात्र दिशा आणि टायगर यांनी त्यांच्या रिलेशनबाबत अजून काहीही स्पष्टपणे किंवा जाहीरपणे सांगितलेले नाही. त्यांच्या सतत एकत्र दिसण्यावरून ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे दिसत आहे.

दिशा जॅकी श्रॉफची सून होईल की नाही ते लवकरच कळेल पण पडद्यावर मात्र ती जॅकी श्रॉफची लहान बहिण झाली आहे. खरे तर जॅकी आणि दिशाने सलमान खानच्याच भारत सिनेमातही काम केलेले आहे. पण त्यात जॅकी सलमानचा पिता आणि दिशा प्रेयसी बनलेली होती. पडद्यावर जॅकी आणि दिशा एका फ्रेममध्ये आले नव्हते. राधे मध्ये मात्र जॅकी आणि दिशा एका फ्रेममध्ये दिसणार आहेत. जॅकी या सिनेमात पोलीस अधिकारी बनला आहे तर दिशाने जॅकीच्या लहान बहिणीची भूमिका केली आहे. झीने मोठी रक्कम देऊन या सिनेमाचे अधिकारी खरेदी केले असून हा सिनेमा मोठ्या पडद्यावरच झळकणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER