कोरोनाची परिस्थिती सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा

CM Uddhav Thackeray

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे दैनंदिन कामकाजात उल्लेख नसतानाही उच्च न्यायालयात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उच्च न्यायालयात का दाखल झाले याचं कारणं गुलदस्त्यात असलं  तरी राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती देण्यासाठी ते मुख्य न्यायमूर्तींची  भेट घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, त्याबाबत न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींशी (Chief Justice) चर्चा करू शकतात. याशिवाय राज्यातील कोरोना परिस्थिती याबाबातही चर्चेची शक्यता आहे. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अचानक उच्च न्यायालयात का आले? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अचानक महाधिवक्ते अभिषेक कुंभकोणी यांच्यासोबत उच्च न्यायालयात दाखल झाले. त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल हेही उपस्थित असल्याची माहिती पुढे आली आहे. प्रोटोकॉलनुसार मुख्य न्यायाधीश मुख्यमंत्र्यांची किंवा कोणत्याही मंत्र्यांची भेट घेऊ शकत नाहीत. मात्र, मुख्यमंत्री हे प्रोटोकॉलनुसार मुख्य न्यायाधीशांची भेट घेऊ शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांच्यात कोरोना लसीकरणावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोर्टात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी सदिच्छा भेट दिल्याचं समजतं. या भेटीत राज्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं.

ही बातमी पण वाचा : ते ठाकरे सरकारचे मंत्री महाराष्ट्राचे जावई आहेत का? आव्हाड प्रकरणावरुन निलेश राणेंचा संताप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button