‘रेमडेसिवीर’बाबत कंपन्यांशी चर्चा; राजेश टोपेंची माहिती

Rajesh Tope

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोना (Corona) संसर्ग वाढत आहे, तर दुसरीकडे रुग्णांना आवश्यक असलेला रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांनीदेखील मान्य केलेली आहे. अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाइकांना हे इंजेक्शन मिळवण्यासाठी पळापळ करावी लागत आहे. हा पुरवठा वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून कोणते प्रयत्न सुरू आहेत, याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती दिली.

राजेश टोपे म्हणाले की, “ज्या कंपन्यांच्या निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे, अशा कंपन्यांनी निर्यातीसाठी तयार केलेला रेमडिसिवीरचा साठा राज्य सरकारला द्यावा, तो मिळाल्यास पाच-सात दिवसांत जी काही कमतरता आहे ती दूर होईल. १५ कंपन्यांना निर्यातबंदी केली आहे, त्यांच्याकडे माल तयार आहे. केवळ त्यांच्या निर्यातबंदी केलेला माल आपल्याला मिळू शकेल का? यासाठीचा प्रयत्न केला जात आहे. ते जर कायदेशीर दृष्टीने यशस्वी झाले, तर काही अडचण राहणार नाही.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button