जमावबंदीचा निर्णय महापौरांशी चर्चा करून घ्यावा – अजित पवार

Ajit Pawar

पुणे : लॉकडाऊन (Lockdown) शिथिल केल्यानंतर राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. राज्याच्या खालावलेल्या अर्थव्यवस्थेचे चाक हलविण्याच्या दृष्टीने सरकारने उद्योगधंदे शंभर टक्के सुरू केलेत. मात्र, दुसरीकेडे कोरोनाचा प्रकोपही पाहायला मिळत आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) कोरोनाचे (Corona) वाढते रुग्ण लक्षात घेऊन पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात पुन्हा जमावबंदी (Curfew) आदेश लागू करण्यासंबदर्भात चर्चा सुरु आहेत. यावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी चर्चा करुन प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

पवार म्हणाले, शहरी भागासह ग्रामीण भागातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी होणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन पुरेसा निधी उपलब्ध करुन देईल. रुग्णांना वेळेत ऑक्सिजनयुक्त खाटा व योग्य उपचार मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने काम करावे. ग्रामीण भागातील रुग्णांना त्याच भागात उपचार मिळवून देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये पुरेशा आरोग्य सुविधा व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करुन द्यावीत अशी सूचना त्यांनी केली.

विधानभवन सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा घेतला.

ही बातमी पण वाचा : शरद पवार वडिलांसारखे, त्यांच्या भूमिकेविषयी बोलू शकत नाही – उदयनराजे भोसले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER