केंद्र आणि शेतकऱ्यांमधील चर्चा आजही तोडग्याविना संपली, ४ जानेवारीला पुढची बैठक

Discussion between the center and the farmers

नवी दिल्ली :- मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची आज झालेली सहावी चर्चेची फेरी तोडग्याविनाच संपली. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला कायद्यात दुरुस्ती नको, तर कायदा रद्द करुन हमी भावाचा कायदा करण्याची मागणी केली आहे. तसेच याच अटीवर चर्चेसाठी तयारी दाखवली. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले होते. या बैठकीकडे आंदोलनकारी शेतकऱ्यांसह देशाचं लक्ष लागलेले होते. त्यातच कोणत्याही परिस्थिती कायदा मागे घेणार नाही अशी भाषा करणाऱ्या मोदी सरकारचा सूरही बदललेला दिसून आले. बुधवारच्या बैठकीत केंद्राच्या दोन मंत्र्यांनी शेतकऱ्यांनी आणलेलं जेवण करत काहीशी नरमाईची भूमिका दाखवली.

केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी विज्ञान भवन येथे शेतकऱ्यांनी आणलेलं जेवण केलं. आंदोलनाच्या सुरुवातीपासून पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत अशाप्रकारे जेवण केलं. याआधी शेतकऱ्यांनी सरकारसोबत झालेल्या चर्चेत सरकारचं जेवण करण्यास नकार देत आंदोलनकारी शेतकरी जे अन्न खातात तेच बैठकीच्या ठिकाणी मागवत आपली भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, मंत्र्यांच्या या पावलाने आश्चर्य व्यक्त होत आहे.
लंगरमधून बैठकीसाठी पाठवण्यात आले 500 जणांचं जेवण…

शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि सरकारमध्ये सध्या सातवी बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दिवसभर चाललेल्या या बैठकी दरम्यान जेवणाची व्यवस्था दिल्ली शिख गुरुद्वारा समितीकडून करण्यात आली. आज त्यांच्या लंगरमधून जवळपास 500 लोकांचं जेवण बैठकीच्या ठिकाणी आणण्यात आलं. बुधवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा 35 वा दिवस होता. त्यामुळे आंदोलनावर काही तोडगा निघतो की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी आधीच तोडगा न निघाल्यास आंदोलन आक्रमक होईल, असा इशारा सरकारला दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER