मराठी साहित्य संमेलन नाशिक येथेच होणार असल्याची चर्चा

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan ) नाशिकला की दिल्लीत, याविषयी महामंडळाच्या रविवारी (दि. ३) औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत जोरदार चर्चा झाली होती. यातून संमेलन नाशिकलाच होणार असल्याचे बोलले जात आहे.

नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण विचारात घेता नाशिक आणि दिल्ली अशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजनासाठीच्या दोनच निमंत्रणांमध्ये चुरस आहे. त्यातही लोकहितवादी मंडळाच्या निमंत्रणालाच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे झुकते माप आहे. त्यामुळे आता साहित्य संमेलन नाशिकलाच होणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, मराठी साहित्य संमेलनाच्या स्पर्धेतून आता नाशिक येथील सार्वजनिक वाचनालय, अंमळनेर आणि सेलू (परभणी) अशी तीन निमंत्रणे काही कारणास्तव मागे घेण्यात आली आहेत. पुण्यातील सरहद संस्थेने दिलेल्या दिल्लीतील निमंत्रणाबद्दल अजूनही निर्णय झालेला नाही.

त्यात बैठकीत निवडल्या गेलेल्या स्थळ निवड समितीकडून नाशिकच्या स्थळाची पाहणी करण्यात येणार आहे. दिल्लीतील निमंत्रणाचा विचार झाला नसला तरी आम्ही संमेलनाचे निमंत्रण अद्यापही मागे घेतले नसल्याचे सरहद संस्थेच्या संजय नहार यांचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER