पुणे महापौरांच्या घरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या पार्टीची चर्चा

Pune Mayor - Murlidhar Mohol

पुणे : पुणेकर (Pune) कोरोनाच्या (Corona) गंभीर संकटात असतानाच सत्ताधारी भाजप (BJP) आणि विरोधक पदाधिकारी मात्र पार्टी करण्यात दंग होते. महापौर बंगल्यावर बुधवारी रात्री पार्टीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे सत्ताधारी पदाधिकाऱ्यांसह विरोधी पक्षांचे गटनेते या पार्टी उपस्थित होते. या पार्टी चे कारण मात्र गुलदस्त्यात असले तरी शहरात महापौरांच्या बंगल्याची झालेल्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्य पार्टीची चर्चा जोरात सुरू आहे.

या पार्टीला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृहनेतेधीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, काँग्रेसचे (Congress) गटनेते आबा बागुल, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार, मनसेचे (MNS) वसंत मोरे यांच्यासह काही नगरसेवकही उपस्थित असल्याचे समजते.

पार्टीचे कारण गुलदस्त्यात काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याकडून ही पार्टी ठेवण्यात आली होती. मात्र, या पार्टीच्या आयोजनाचे कारण मात्र समजू शकले नाही. एकीकडे काँग्रेसने पालिका कर अभय योजनेवरून भाजपवर जोरदार टीका केली होती, तर दुसरीकडे ही मंडळी पार्टीसाठी एकत्र आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुळातच पुण्यातील परिस्थिती गंभीर असताना अशी पार्टी करण्याची ही वेळ आहे का आली? प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER